सांघिक प्रयत्नातून जिल्हा निर्मल शक्य

सांघिक प्रयत्नातून जिल्हा निर्मल शक्य
http://newshunt.com/share/22357932
Source:Lokmat

Posted in Uncategorized | Leave a comment

उशिरा सुचलेलं शहाणपण

केंद्र सरकारच्या मंत्री गटानं ११ ऑगस्ट रोजी जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला मंजुरी देऊन क्रांती दिनाच्या उपरांत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. हिंदूंसाठी पवित्र असलेल्या श्रावण आणि मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या सुरुवातीला हा निर्णय घेतलेल्या केंद्र सरकारचं विशेष अभिनंदन केलंच पाहिजे. कारण या निर्णयामुळं भारतातील जातिनिहाय आकडेवारी निश्चितपणानं उपलब्ध होईल आणि या विश्वसनीय आकडेवारीच्या साहाय्यानं विविध मागास, अति मागास जाती गटांच्या कल्याणाचे उपक्रम राबवण्यासाठी मदतच होणार आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांचे खुल्या दिलानं अभिनंदन केले पाहिजे. या दोघांनी विविध खासदारांचा पाठिंबा मिळवीत जातीनिहाय जणगणनेची मागणी रेटून धरल्यानं मागासवर्गाची जातीनिहाय जनगणना शक्य होणार आहे.
यापूर्वी १९३१ साली इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली होती; परंतु त्यानंतर तब्बल ऐंशी वर्षे उलटल्यानंतरही सत्तेवर असलेल्या एतद्देशीयांना देशातील जातवास्तव समजून घेण्यासाठी अशा प्रकारची जनगणना झाली पाहिजे, हे सुचलं कसं नाही, असा प्रश्न मनात येतो. जातीनिहाय जनगणना करणं म्हणजे जातिभेद करणं, अशा चुकीच्या समजुतीपोटी असं झालं असावं; पण जातीनिहाय जनगणना म्हणजे जातिभेद करणं आहे ही भ्रामक कल्पना डोक्यातून काढली पाहिजे आणि जाती वास्तवाला स्वीकारून त्यांच्या उत्थानासाठी नियोजनबद्ध पावलं उचलली पाहिजेत. यासाठी ही जनगणना साहाय्यकारी ठरू शकते, यात तिळमात्र शंका नाही. जातीनिहाय जनगणनेमुळं देशाची पीछेहाट होईल. जातिभेद वाढेल, जातीनिहाय जनगणना ही द्वेष वाढवणारी आहे. अशा पद्धतीनं बèयाच पुरोगामी म्हणवून घेणाèया राजकारणी, समाजकारणी, धर्मकारणी आणि जातीयतेचे अहंगंड जपत स्वत:च्या जाती गटाचं हित साधू पाहणाèयांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध दर्शवला होता; पण यासाठीच्या असलेल्या मंत्री गटानं हा विरोध डावलून जातीनिहाय जनगणनेच्या बाजूनं निर्णय घेतला. यासाठी प्रयत्न करणाèया मंत्र्यांचे आणि इतर सर्वांचेच अभिनंदन केले पाहिजे.
भारतातील जातवास्तव सर्वज्ञात आहे. येथील परंपरागत उच्च जाती गट हे नेहमीच कनिष्ठ जाती गटांवर पदोपदी अन्याय करीत असतात. यासाठी ते सत्ता आणि पैशाचा खुलेआम वापर करतात. हे देशातील व महाराष्ट्रातील अनेक घटनांवरून सिद्ध झालं आहे. या पीडित, मागास जाती गटांना विकासाच्या प्रक्रियेत नियोजनपूर्वक व सुयोग्य पद्धतीनं सामावून घ्यायचं असेल, तर त्या जाती गटांच्या लोकसंख्येची तथ्यात्मक माहिती अद्ययावत स्वरूपात उपलब्ध असणं गरजेचं ठरतं. ‘जात’ नाही ती ‘जात’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. जाती या न संपणार्‍या आहेत. कारण आंतरजातीय विवाहाद्वारे व अन्य प्रयत्नानांनीही जाती नष्ट होण्याऐवजी नव्या प्रजाती निर्माण होऊ पाहत आहेत. म्हणूनच भारतातील जातवास्तव समजून घेऊन जातीयवाद नष्टतेचे प्रयत्‍न करणे, जाती-जातींमधील दरी कमी करणे, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्‍न करणे आदी बाबी व्हायला पाहिजेत.
प्रत्येक जाती गटाला विकासाच्या समसमान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या, तर जातीय तेढ कमी होऊन राष्ट्रविकासाला मदतच होईल. जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा केंद्र शासनाला उशिरा सुचलेलं शहाणपण असलं तरी या निर्णयाचं स्वागत करून यासाठी प्रत्येक भारतीयानं सहकार्य केलं पाहिजे.

Posted in Uncategorized | Tagged | Leave a comment

मैत्रीत हवं ओथंबलेपण

नुकताच फ्रेंडशिप डे  पार पडलाय जगभर. आपल्याकडेही तो चांगलाच रुळलाय म्हणा. ताजा किंवा शिळा सगळ्याच पद्धतीने तो खेड्यापासून ते शहर-महानगरांपर्यंत साजरा होतोय. कुठे शुभेच्छांची देवाण-घेवाण होते, तर कुठे हातावर बांधलं जातंय मित्रत्वाला. माझ्यासारखा मात्र जवळच्या किंवा दूरच्याही मित्रांना अंत:करणातल्या बंधांनी बांधण्याचा प्रयत्‍न करीत असतो. असं असलं तरी हा फ्रेंडशिप डेचा थर्टी फर्स्ट होतो की काय अशी भीती मनात वाटत होती आणि यावर्षी घडलंही तसंच. एव्हाना पुण्याचं तोकड्या कपड्यातलं नागडं फ्रेंडशिपचं प्रदर्शन सर्वांनाच कळलंय विविध माध्यमातून; पण पुण्यात सिम्बॉयसिसमध्ये शिकणार्‍या श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या कार्ट्यान्ची फ्रेंडशिप डे साजरा करण्याची तर्‍हा बघून मला अजिबात विशेष वाटलं नाही; पण ही बातमी वर्तमानपत्रात वाचून मला माझ्या गावाकडच्या भास्कर चौधरी, संतोष तायडे या जिवलग मित्रांनी आमच्या मित्रत्वाची भीडभाड न ठेवता मला खूप शिव्या घातल्या. माझं शहरातलं शहाणपणसुद्धा काढलं त्यांनी. कारण की, महानुभावाचार्य भास्करभट्ट बोरीकरांचा वारसा सांगणार्‍या बोरी (परभणी) गावच्या माझ्या मित्रांना मीच फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करायला सांगितलं होतं. मीच जणू काय फ्रेंडशिप डेचा स्पॉन्सर होतो या न्यायाने मला त्यांनी झापलं खूप. पुण्यातला अतिश्रीमंतांचा धिंगाणा आणि गावाकडच्या नात्यातला साधेपणा, पण मजबूतपणा याच्या तुलनेत मी मात्र विचार करतोय यात कुणाचा दोष? की हा जागतिकीकरणाचा महिमा?  माझ्या मते, ज्या चांगल्या परंपरा आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत. मग तो फ्रेंडशिप डे असो वा व्हॅलेंन्टाईन. हे दिनविशेष सहजीवनाला नवा अनुभव प्राप्त करून देण्यासाठी मदत करीत असतात. असं माझं ठाम मत आहे; पण हे दिन सध्या ओंगळवाण्या स्वरूपात साजरे करावेत याला मात्र मी विरोध करीन. मित्र वा मैत्रिणींच्या मनगटावर विविधरंगी महागडे पट्टे बांधण्यापेक्षा आपण आपल्या मित्र वा मैत्रिणीच्या मनात आपल्याविषयीचे बंध नितळ, अतुट आणि विश्वसनीय ठेवू शकलो पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मित्र-मैत्रिणी हे वर्गातले, कॉलेजमधले, गल्लीतले वा समवयस्क असावेत असं काहीच नाही. लहानापासून ते वृद्धांपर्यंत, खेड्यापासून ते शहरापर्यंत, कोणत्याही वय व व्यवसायातील मित्र जोडता आले पाहिजेत. आपल्या वयापेक्षा लहान आणि मोठे मित्र जोडता आले, तर उत्तमच. जास्तीचे अनुभव गाठीला बांधता येतात हा माझा अनुभव आहे. मला आहेत मित्र चिमीपासून चिमणरावापर्यंत, कचरा गोळा करणार्‍यापासून ते उद्योगधंद्यांच्या मालकापर्यंत. टुकारछाप पोट्ट्यान्पासून ते समाजसेवक राजकारण्यापर्यंत. मैत्री कशी रुजवावी, सजवावी आणि टिकवावी याचे कोचिंग क्लासेस सुरू झाले, तर नवल नाही या काळात. कारण पवित्र मैत्री हल्ली अभावानेच बघायला मिळते. मला कुणाला सल्ला नाही द्यायचा की कुणी कुणाशी आणि कशी मैत्री करावी; पण मी मात्र नेहमीच प्रयत्न करीत असतो माझ्या मित्रमैत्रिणींच्या भाव-भावनांना जपण्याचा. मला आवडते मैत्रीमधलं अलोट प्रेम आणि भावनांनी ओथंबलेपण. असे असेल तरच खरी मैत्री होऊ शकते आणि टिकू शकते. सध्या बेगडीपणा वाढला असून मैत्रीतही हे बेगडीपण अनेक ठिकाणी दिसून येते. असे जर झाले तर फ्रेंडशिप डे साजरा करण्यातही काही अर्थ उरणार नाही. केवळ बेगडीपणाने जगूनही काही फायदा नाही. भावना जपण्यातच खरे मोठेपण आहे. पण भावनाशुन्यता वाढत चालल्याने अस्सल प्रेम, मैत्रीही दुर्मिळ होत चालली आहे. तुम्हाला काय वाटतं? विचार करा आणि मैत्री जगायला सुरुवात करा. हॅपी फ्रेंडशिप डे टू माय ऑल नोन अ‍ॅण्ड अननोन फ्रेंडस् हू आर अलवेज इन माय हार्ट.

Posted in Uncategorized | Tagged | 3 Comments